स्टंटबाजी की कुरघोड्या ?

स्टंटबाजी की कुरघोड्या ?

पुण्यात रविवारी, २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी कसबा आणि चिंचवड विभागात पोट निवडणूक पार पडली. गुरुवारी २ मार्च, २०२३ रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, निकाल लागण्यापूर्वीच पुण्यात रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून फलकबाजी करण्यात आली आहे.

एकीकडे, पुण्यातील कसबा पेठेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक सोशल मीडियावरही व्हायरल झाले. त्यानंतर, २ तासातच हे फलक उतरवण्यात आले. तर दुसरीकडे, पुण्यातील सारसबाग आणि वडगाव चौकात भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. निकालाआधीच ‘आमदार हेमंत रासने’ असा उल्लेख करत समर्थकांकडून फलक लावून रासने यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
निकालाआधीच दोन्ही गटाकडून स्वयंघोषीत विजय जाहीर करून फलकबाजी सुरु आहे. त्यामुळे, नक्की आचारसंहिता कोण भंग करत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, ही स्टंटबाजी आहे की, एकमेकांविरोधात केलेल्या या कुरघोड्या आहेत, याचे उत्तर मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version