बँक कर्मचारी दोन दिवस संपावर

बँक कर्मचारी दोन दिवस संपावर

नवीन कामगार कायदा, खासगीकरणाल विरोध तसेच इतर अन्य मागण्यांसाठी २८ आणि २९ रोजी कामगारांचा देशव्यापी संप आहे. दरम्यान, या संपामध्ये बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा सहभाग घेतला आहे. त्यामुळे या दोन दिवशी बँकांचे सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

सोमवारपासून बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. हा संप देशव्यापी असून याचा परिणाम नागपूरमध्ये पाहायला मिळाला. नागपूरातील सर्वच बँक बंद असून बँकेचे कर्मचारी बँकांच्याबाहेर आंदोलन करत आहेत. सरकार खाजगीकरणाचा डाव रचत असून त्याविरोधात हे आंदोलन पुकारले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.

कर्मचाऱ्यांचा हा संप नवीन कामगार कायद्याच्या विरोधात आहे. तसेच सरकार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करू पाहत आहे. सार्वजनिक आणि खासगी उद्योगांमधून कायमस्वरुपी रिक्त जागा न भरता सरसकट कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे यास विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राज्यातील जवळपास पाच लाखांहून अधिक बँक कर्माचारी, अधिकारी संपात सहभागी झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version