म्हणून प्लॅटफॉर्मवर धावली ऑटोरिक्षा, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल!

म्हणून प्लॅटफॉर्मवर धावली ऑटोरिक्षा, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल!

अत्यवस्थ झालेल्या वृद्ध रुग्णाला मदत करण्यासाठी प्लॅटफार्मवर रिक्षा चालवली म्हणून रिक्षचालकावर गुन्हा दाखल करण्यास आला आहे.

काय घडलं होतं नेमकं?

पालघरमधील मासवण भागात घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी गेलेले कुटुंब मुंबईतील घरी परत येत होते. त्यावेळी कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि बघता बघता त्यांची प्रकृती खालावली.

मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

वृद्ध प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर चक्क रिक्षा धावली.

रेल्वे स्थानकावर असलेल्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं.

मात्र 15 मिनिटं उलटून गेल्यानंतरही डॉक्टर आले नाहीत, त्यामुळे एका नर्सने येऊन वृद्धाला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती.

वृद्धाची तब्येत ढासळत असल्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून फलाटावरील चिकू विक्रेता जयवंत चौहान यांनी रिक्षा थेट फलाटावर आणली.

वृद्धाला रिक्षातून पुढील उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं.

रेल्वे स्थानकात आलेल्या रिक्षाची चर्चा प्रवाशांमध्ये सूर होती.

रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतीमुळे त्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

मात्र रेल्वेस्थानकात रिक्षा चालवल्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर 149 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. आपला धंदा थांबवून जर आपण केलेल्या मदतीने गुन्हा दाखल होणार असेल, तर यापुढे कुणालाही अशी मदत करताना आपल्याला विचारच करावा लागेल असं या रिक्षाचालकाने म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version