वाशीममध्ये झळकले औरंगजेबाचे बॅनर

वाशीममध्ये झळकले औरंगजेबाचे बॅनर

बाबा हयात कलदंर दर्ग्यातील उरूस निमित्त मंगरूळपीर शहरात रविवारी रात्री मिरवणूक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो असलेल्या बॅनरसह पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. याचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत कारवाईची मागणी केलीये. उरूससाठी पोलिसांनी फक्त दोन डीजेची परवानगी दिल्यानंतरही तब्बल २१ डीजे बिनधास्त वाजवल्याचही समोर आलंय. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मंगरूळपीर येथे वार्षिक ऊर्सनिमित्त ‘संदल’चे आयोजन करण्यात येते. शनिवारी ऊर्ससाठी पोलिसांनी केवळ दोन ‘डीजें’ची परवानगी दिली होती. मात्र, तब्बल २१ ‘डीजे’ वाजवण्यात आले. यात काही जण चक्क औरंगजेबाचे छायाचित्र घेऊन नाचतानाची चित्रफीत सार्वत्रिक झाली. रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवला. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.

काय घडला प्रकार पाहुयात ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version