‘पुढील आदेशापर्यंत औरंगाबादच उल्लेख’

‘पुढील आदेशापर्यंत औरंगाबादच उल्लेख’

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोन्ही शहरांचे नामांतर करण्यात आले. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबाद राहणार.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे’ असे आदेश काढल्यामुळे नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करा असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांना दिले आहेत. तर याबाबत पाण्डेय यांनी आदेश देखील काढले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version