‘छत्तीसगडमधून कोळसा विकत घेण्याचे प्रयत्न’ – अजित पवार

‘छत्तीसगडमधून कोळसा विकत घेण्याचे प्रयत्न’ – अजित पवार

राज्यात बुधवारपासून भारनियमनाची घोषणा करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भारनियमनाची घोषणा केली. यावरून राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील भारनियमनावर भाष्य केले आहे. राज्यात कोळशाचा तुटवडा पडला आहे. त्यामुळे परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून छत्तीसगडमध्ये कोळशाची खाण विकत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, राज्यांना पाहिजे तेवढा कोळसा पुरवला जात नसल्यामुळे राज्यात विजटंचाई उद्भवली आहे. त्यामुळे राज्यात भारनियमनाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, भारनियमन कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच दर आठवड्याला भारनियमनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याचे पवार म्हणाले. तसेच राज्यात कोळशाचा तुटवडा भासल्यामुळे छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे सुरू आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विचारांचे सरकार आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा छत्तीसगड सरकारला महाराष्ट्राला मदत करण्यास सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version