असद अहमद पोलीस चकमकीत ठार

असद अहमद पोलीस चकमकीत ठार

उमेश पाल हत्याप्रकरणी आरोपी अतीक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम उत्तर प्रदेशमधील झाशी येथे झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. झाशी येथे डीवायएसपी नवेंदू आणि डीवायएसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चकमकीत हे दोघे ठार झाले आहेत. तसेच, विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.

उमेश पाल हत्याप्रकरणात उत्तर प्रदेशच्या एसटीएफने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस अनेक आरोपींना पकडण्याचे कार्य करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अतीकची पत्नी शाइस्ता परवीन, अतीकचा मुलगा असद यांच्यासह अनेक आरोपी फरार आहेत. याप्रकरणात आरोपींच्या शोधात पोलिसांची अनेक पथके कार्यरत होते. तर, उत्तरप्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम सतर्क झाली आणि झाशीमध्ये झालेल्या चकमकीत असद आणि त्याचा साथीदार गुलाम दोघेही ठार झाले आहेत.

असदवर पाच लाखांचं बक्षीस

उमेश पाल हत्याप्रकरणी असद अहमद आणि त्याचा साथीदार पोलीस चकमकीत ठार झाला आहे. उमेश पाल हत्याप्रकरणात दोघांचा सहभाग होता. त्या दोघांवर पाच-पाच लाख रुपायंचे बक्षीस होते. याप्रकरणी अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार हे दोघेही वॉन्टेड होते. त्यामुळे यांचा शोध घेणाऱ्याला प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. दरम्यान, उत्तरप्रदेशमधील झाशीमध्ये झालेल्या चकमकीत असद अहमद आणि साथीदार गुलाम ठार झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version