मुंबई, ३० मे २०२३ , प्रतिनिधी : ‘शादी डॉट कॉम’ या कंपनीचे मालक तसेच शार्क टॅंक फेम उद्योजक अनुपम मित्तल हे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. अशातच त्यांनी आपल्या चाहत्यांना एक दुःखद बातमी दिली आहे. अनुपम मित्तल यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून माहिती दिली.
अनुपम मित्तल यांचे वडील गोपाल कृष्ण मित्तल यांचे सोमवारी (२९ मे रोजी) निधन झाले. यामुळे अनुपमने आपल्या इंस्टाग्रामवर एक भावनिक फोटो पोस्ट केला आहे. यात अनुपम चे वडील आणि संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या फोटोखाली “शाइन ऑन अस डॅडी.” म्हणजेच तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहूद्या. असे कॅप्शन दिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.