दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू

दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. प्रदीर्घ आजारपणामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून चंदन जिंदल असे या दिवंगत विद्यार्थ्याचे नाव आहे. चंदन जिंदलवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांचे कुटुंबिय त्याच्यासोबत हजर होते.

युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या गोळीबारात काल एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज दिवंगत विद्यार्थ्याचा प्रदीर्घ आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. जिंदल कुटुंबिय मृत्यूसमयी चंदनसोबत हजर होते. तर चंदन जिंदलच्या मृत्यूबाबत भारत सरकारकडून शोक व्यक्त होत आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. तर दिवसेंदवस रशियाचे युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र होत चालले आहेत. अशातच, युक्रेनही माघार घेण्यास तयार नसून जशास तसे उत्तर देत आहे. युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रशियाकडून सुरू असलेल्या तीव्र लढाईत युक्रेनमधील अनेक नागरिक मारले गेले आहेत. तसेच अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार कार्यशील आहे. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना मायेदशी आणण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version