अनिल परब ईडीच्या चौकशीला गैरहजर

अनिल परब ईडीच्या चौकशीला गैरहजर

विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या मागे ईडीची पिडा लागली आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब   यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

मनी लॉड्रिंग प्रकरणी अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहे. ईडीने याआधी परब यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा  अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला आहे. परब यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आले आहे. याआधी एकदा अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीला आले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परब चौकशीला गैरहजर राहिले आहेत. मुंबईत पोहचल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार आहेत.

तर, ईडीने एकदा त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती. मागील महिन्यात २६ मे रोजी  अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. तसंच अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापे टाकले होते.१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू होती. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे ५० कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version