महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची मागणी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, न्यायालयाने देशमुखांची मागणी फेटाळली आहे. न्यायालयाने अनिल देशमुखांना जे जे रुग्णालयात उपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक झाली आहे. तुरुगांत चालताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, देशमुखांना झालेली दुखापत गंभीर असल्याचे सांगत शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी देशमुखांनी केली होती. मात्र, न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने देशमुखांची मागणी फेटाळत त्यांना जे जे रुग्णालयात उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांच्यासोबत घरातील एका व्यक्तिला रुग्णालयात उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या क्रिटीकेअर रुग्णालयात मलिकांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपाचारादरम्यान उपस्थित राहायची मुभा न्यायालयाने दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.