सैराट,फँड्री, नाळ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची एक वेगळीच शैली आहे. केवळ त्याच्या चित्रपटांचेच नाही तर त्यांच्या अनोख्या शैलीचे देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. अलीकडेच त्यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाने जरी काही विशेष कामगिरी केली नसली तरी देखील नागराज अण्णांची सोशल मीडियावरही विशेष फॉलोइंग आहे. दरम्यान नागराज मंजुळेंची हुबेहूब नक्कल करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत त्या तरुणानी अण्णांची दाढी आणि चष्मा देखील हुबेहूब वापरलाय.
इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचं नाव योगेश तवार असं आहे. इन्स्टाग्रामवर असे वेगवेगळे व्हिडिओ हे नेहमी करत असतो.योगेश ची नक्कल पाहून नेटकरी भारावून गेलेत. त्याच्या या पोस्टखाली कंमेंट्सचा वर्षाव होतोय. नागराज मंजुळे यांची नक्कल केलेल्या या व्हिडिओत तो नागराज स्टाइलमध्ये बिर्याणीची रेसिपी दाखवताना दिसतोय. विशेष त्याच्या या हटके व्हिडिओला ३५ हजाराहून जास्त व्ह्युव्ज मिळाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.