यंदा शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या 2018 च्या तुलनेत 10 लाखांनी कमी झाली असली, तरी या वर्षीचं साईचरणी होणाऱ्या दानात मात्र 2 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 2019 मध्ये साई चरणी तब्बल 287 कोटींहून जास्त दान प्राप्त झालंय.
दरवर्षी साई बाबांच्या देणगीत वाढच होत असल्याचं दिसून येतंय. साई संस्थानचं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असं असतं.
मात्र अनेकांना कॅलेंडर वर्षात साईबाबांना किती दान आलं, हे जाणून घ्यायची उत्सकुता असते.
शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या उत्सव काळात तसंच सलग सुट्ट्यांच्या दिवसातील 4 दिवसांत होणारं दानही 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतं.
2019 सालच्या कॅलेंडर वर्षाचा विचार केला, तर साईबाबांना तब्बल 287 कोटींहून अधिकचं दान झालंय.
या व्यतिरिक्त 19 किलो सोने आणि तब्बल 391 किलो चांदीही प्राप्त झाली आहे.
दक्षिणा पेटीत 156 कोटी 49 लाख 2350 रुपयांचं गुप्तदान
देणगी काऊंटर वर 60 कोटी 84 लाख 8 हजार 590 रुपयांचं दान
चेक, डीडी च्या स्वरुपात 23 कोटी 35 लाख 90 हजार 409 रुपये
मनिऑर्डरच्या स्वरुपात 2 कोटी 17 लाख 83 हजार 515 रुपये
डेबिट, क्रेडीट कार्डच्या द्वारे 17 कोटी 59 लाख 11 हजार 424 रुपये
ऑनलाईन देणगी द्वारे 16 कोटी 2 लाख 51 हजार 606 रुपये
याशिवाय
सोनं 19048.860 ग्रॅम
चांदी 391757.470 ग्रॅम
2017 मध्ये साईभक्तांनी तब्बल 288 कोटी रुपयांचं दान केलं होतं तर 2018 मध्ये हा आकडा 285 कोटी होता.
साई संस्थानकडे असलेली गंगाजळी आता 2274 कोटीच्या जवळपास जाऊन पोहचली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.