Car Burn Accident: महामार्गावर धावत्या कारचा झाला ‘अग्निकुंड’; पाच जण जिवंत जळून खाक, काळजाचा थरकाप उडवणारी घटना

चालक गंभीर जखमी असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Car Burn Accident: महामार्गावर धावत्या कारचा झाला ‘अग्निकुंड’; पाच जण जिवंत जळून खाक, काळजाचा थरकाप उडवणारी घटना

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड परिसरात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. धावत्या कारला अचानक आग लागल्याने कारमधील पाच जण जिवंत जळून मृत्युमुखी पडले, तर चालक गंभीर भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना मौजपूरजवळ गुरुवारी (30 एप्रिल 2026) रात्री सुमारे 1 वाजता घडली. दिल्लीहून कोट्याकडे जाणाऱ्या कारला अज्ञात कारणांमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढले आणि ती काही मिनिटांत ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली. कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या भीषण अपघातात मध्यप्रदेशातील श्योपुर येथील तीन महिला, एक लहान मुलगी आणि एक पुरुष असे पाच जण जागीच जळून मृत्युमुखी पडले. अपघात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील पिलर क्रमांक 115/300 जवळ घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कारचा चालक विनोद कुमार मेहर यांनी प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, या घटनेत ते सुमारे 80 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना प्रथम पिनान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी अलवर येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा: Satara Water Crisis: सातारा जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण; 35 गावं, 186 वाड्यांना झळ, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर

घटनेची माहिती मिळताच एनएचएआय पथक, रुग्णवाहिका आणि लक्ष्मणगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दमकल दल पोहोचेपर्यंत आगीने कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. नंतर दोन अग्निशमन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

हेही वाचा: Bacchu Kadu Vidhan Parishad : बच्चू कडूंना विधानपरिषदेची उमेदवारी, 'प्रहार' पक्ष शिवसेनेत विलीन होणार?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version