…म्हणून ऐकू येत नाही – अलका याज्ञिक

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी इन्स्टा पोस्ट करून आता ऐकू येत नाही, श्रवणशक्तीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे अशी माहिती चाहत्यांना दिली आहे.
…म्हणून ऐकू येत नाही – अलका याज्ञिक

मुंबई : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी इन्स्टा पोस्ट करून आता ऐकू येत नाही, श्रवणशक्तीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे अशी माहिती चाहत्यांना दिली आहे. ही इन्स्टा पोस्ट अलका याज्ञिक यांनी १७ जून रोजी केली. विमानातून बाहेर आले आणि अचानक हा त्रास सुरू झाला. वैद्यकीय तपासणी केल्यावर एक दुर्मिळ आजार झाल्याची जाणीव झाल्याचे अलका याज्ञिक यांनी इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केले आहे. या पोस्टवर अलका याज्ञिक यांच्या असंख्य चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेक लोकप्रिय गायक, गायिकांनी दुःख व्यक्त केले आहे आणि अलका याज्ञिक लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचे सांगितले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version