Plane Emergency Landing: हवेमध्येच तांत्रिक बिघाड, अन् वैमानिकाने प्रसंगावधान राखलं; एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान, विमानतळ प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवत अग्निशमन, वैद्यकीय आणि बचाव पथके आधीच सज्ज ठेवली होती.
Plane Emergency Landing: हवेमध्येच तांत्रिक बिघाड, अन् वैमानिकाने प्रसंगावधान राखलं; एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बागडोगरा ते दिल्ली असा प्रवास करणारे आयएक्स-1523 हे विमान 36,000 फूट उंचीवर उड्डाण करत असताना केबिनमधील एव्हियोनिक पॅनलमधून धूर निघत असल्याचा संशय निर्माण झाला.

या घटनेची गंभीर दखल घेत वैमानिकांनी तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. परिस्थितीचा अंदाज घेऊन विमान लखनऊच्या चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी विमानाची सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

दरम्यान, विमानतळ प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवत अग्निशमन, वैद्यकीय आणि बचाव पथके आधीच सज्ज ठेवली होती. विमान उतरल्यावर सर्व 148 प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि टर्मिनल-3 मध्ये हलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली.

हेही वाचा: Skyscraper Glass Buildings : शहरातील गगनचुंबी इमारतींना काचा फक्त शोभेसाठी नाहीत तर यामागे आहे मोठं रंजक कारण

लँडिंगनंतर विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. विमानतळाच्या अग्निशमन विभागासह तांत्रिक पथकांनी तपास केला असता धूर किंवा आगीचे कोणतेही ठोस चिन्ह आढळले नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने विमान तात्पुरते ग्राउंड करण्यात आले असून, आवश्यक तांत्रिक तपासणी आणि एअरवर्थीनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ते पुन्हा उड्डाण करणार आहे.

या घटनेनंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. काही प्रवाशांना अन्य उड्डाणांद्वारे त्यांच्या गंतव्यस्थानी पाठवण्यात आले, तर काहींना हॉटेलमध्ये मुक्कामाची सुविधा देण्यात आली. पुढील फ्लाइट्ससाठी बुकिंगचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, यापूर्वीही खराब हवामानामुळे एअर इंडिया एक्सप्रेसचे आणखी एक विमान वळवण्यात आले होते. बंगळूरहून कोलकात्याकडे जाणाऱ्या या विमानाला कोलकात्यात अचानक निर्माण झालेल्या खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे काही काळ आकाशात घिरट्या घातल्यानंतर हे विमानही लखनऊच्या चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले होते. 

हेही वाचा: Ashwini Bhide : मुंबई महापालिकेची धुरा महिलांच्या हाती! महापौरनंतर आता आयुक्त पदावरही महिला?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version