ऍड. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढणार

ऍड. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढणार

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलीस सदावर्ते यांना घेऊन साताऱ्यात पोहचले आहेत. अशातच, गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मराठा आरक्षणासाठी बेकायदेशीररित्या निधी गोळा केली असल्याची तक्रार सदावर्तेंविरोधात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी सदावर्तेंची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत आले होते. दरम्यान, सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस सदावर्तेंना घेऊन साताऱ्यात पोहचले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version