Shashank Ketkar : निगरगट्ट, कोडगे, थापांचा कंटाळा, कुंडलीच बाहेर काढणार; शशांक केतकर निर्मात्यावर का भडकला?

अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनेवरील 'मुरांबा' या मालिकेत काम करत आहे. मात्र त्याने केलेल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने सर्वांच लक्ष वेधल आहे. 
Shashank Ketkar : निगरगट्ट, कोडगे, थापांचा कंटाळा, कुंडलीच बाहेर काढणार; शशांक केतकर निर्मात्यावर का भडकला?

अनेक टीव्ही कलाकारंचे त्यांच्या पडद्याआड निर्मात्यासोबत किंवा कोणत्या तरी सहकाऱ्यासह काही ना काही तरी वाद-विवाद होत असतात. ज्यावर टीमकडून योग्य तो निर्णय घेतला गेला नाही किंवा होणारा त्रास अधिकपट होऊ लागला तर हे कलाकार त्यांना होणारा त्रास थेट सोशल मीडियावर शेअर करु लागतात. असाच काहीसा प्रकार मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरसोबत घडला आहे. अभिनेता शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनेवरील 'मुरांबा' या मालिकेत काम करत आहे. मात्र त्याने केलेल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने सर्वांच लक्ष वेधल आहे. 

हेही वाचा- Sayaji Shinde Post On Marathi Manoos : 'वेळ आली आहे मराठी माणसानं खडबडून जागं होण्याची'; मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ पोस्ट
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये शशांक केतकर याने लिहिले की, '5 वर्ष होऊन गेली. मागची 5 वर्ष आणि 8 ऑक्टोबर 2025 पासून पुन्हा संपर्क स्थापन झाल्यामुळे तेव्हा पासून दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही. थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता. अजून एक तारीख दिली आहे त्याने उद्याची (5 जानेवारी 2026) पुर्ण मानधन जमा झाले नाही तर एक तपशीलवार व्हिडिओ पोस्ट करेन… सगळ्याच कुंडली सकट आणि मानधन झाले तर.. तसाही मानधन झाल्याचा व्हिडिओ पण पोस्ट करेन.'

हेही वाचा- Jay Bhanushali-Mahhi Vij Divorce: 14 वर्षांचा संसार मोडला! जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्याला पूर्णविराम
यावेळी शशांकने या पोस्टमध्ये कोणत्याही मालिकेचा किंवा निर्मात्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्याचा रोख कोणाकडे आहे हे ठरवण अवघड झालं आहे. मात्र त्याने 2018-2020 या कालावधीत निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांची मालिका 'सुखांच्या सरींनी… हे मन बावरे' या मालिकेत काम केलं होत. शशांकने पोस्टमध्ये 5 वर्षांचा कालावधी नमूद केल्याप्रमाणे ही मालिका केल्यानंतर मानधन थकवल्याचा अंदाज बांधला नेटकऱ्यांकडून बांधला जात आहे. तसेच या मालिकेतील अनेक कलाकारांनी या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर पोस्ट करत निर्मात्यावर टीका केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version