कमल हासन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवरील अपघात ३ जणांचा मृत्यू

कमल हासन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवरील अपघात ३ जणांचा मृत्यू

प्रसिद्ध तामिल अभिनेते कमल हासन यांच्या एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती स्वत: कमल हासन यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

सेटवर झालेल्या या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले.

नक्की काय घडलं ?

कमल हासन यांच्या इंडियन २ या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. हे चित्रीकरण इव्हीपी फिल्मसिटीमध्ये करण्यात येत होतं. या चित्रीकरणादरम्यान अचानक क्रेन कोसळली. यामुळे या अपघातात ३ जणांचा जागीच जीव गेला.

मृतांमध्ये दिग्दर्शक शंकर यांचे पर्सनल दिग्दर्शक मधु , सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा आणि एका कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे.

तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

बुधवारी रात्री ही घटना घडली. कमल हासन यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

माझ्या सिनेसृष्टीतील करियरमधला हा कधी न पाहिलेला अपघात होता. या अपघातात मी माझे ३ सहकारी गमावले. असे कमल हासन यांनी ट्विट केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version