त्र्यंबकेश्वर प्रकरणात ५ जणांवर गुन्हे दाखल

त्र्यंबकेश्वर प्रकरणात ५ जणांवर गुन्हे दाखल

त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

या घटनेत मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठीचे पत्र पोलिसांना देण्यात आले होते. तर ब्राम्हण महासंघाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे. यासंबधीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसात ही प्रकरण चर्चेत आलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत तपास चालू आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आहे. या प्रकरणात ५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून लवकरच त्यांना ताब्यात घेतलं जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version