दहावीच्या हॉलतिकीटासाठी मागितली ३० हजार रुपयांची लाच

दहावीच्या हॉलतिकीटासाठी मागितली ३० हजार रुपयांची लाच

आजपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये खळबळ उडवणारी घटना घडली आहे. दहावीच्या परीक्षा प्रवेशपत्र देण्यासाठी ३० हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे.

औरंगाबादमधील कलावती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस.पी. जवळकर यांन एक बहि:स्थ विद्यार्थ्यांकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. परीक्षा प्रवेश पत्र देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी बहि:स्थ परीक्षार्थ्याके त्याने ३० हजार रुपये मागितल्यानंतर त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत पोलिसांनी अटक केली आहे. शाळेतील लिपिक सविता खामगावकर यादेखील लाचखोरीत सहभागी असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version