पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारी नमाजच्या वेळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात ४५ नागरिक ठार झाले असून ६५हून अधिक जण जखमी झाली आहेत. या घटनेमुळे पाकिस्तान हादरून गेले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली जात असताना मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या दुर्घटनेमध्ये ३६ नागरिक मरण पावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच ५०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी १० जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
तसेच, दोन हल्लेखोऱ्यांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना पहारा देणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. या गोळीबारानंतर मशिदीत स्फोट झाला असल्याचेही सुत्रांनी संगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.