तामिळनाडूत मदुराईजवळ रेल्वेच्या डब्याला आग

तामिळनाडूत मदुराईजवळ रेल्वेच्या डब्याला आग

मदुराई, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : तामिळनाडूमधील मदुराईजवळ धक्कादायक घटना घडली. मदुराई स्थानकाजवळ थांबलेल्या पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागली. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि वीस जण जखमी झाले. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आगीची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावेळी गाडी मदुराई यार्ड जंक्शनजवळ उभी होती.

रेल्वेत ज्वलनशील पदार्थ, वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. पण या नियमाचे उल्लंघन करून काही प्रवासी अवैधपणे गॅस सिलिंडर घेऊन गाडीमध्ये शिरले होते. हे प्रवासी ज्या डब्यात होते त्याच डब्याला आग लागली, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. आग लागल्यामुळे गाडीचा टुरिस्ट कोच अर्थात पर्यटकांचा डबा जळून खाक झाला.

अग्निशमन दलाने सकाळी सव्वासातपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आग नियंत्रणात आणली. आग लागून खाक झालेला टुरिस्ट कोच गाडीपासून वेगळा करण्यात आला आहे. आगीत फक्त टुरिस्ट कोचचे नुकसान झाले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. नियमानुसार दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version