स्विमिंग पूलमध्ये बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

नाशिकच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात व्हीलावर संपूर्ण परिवार गेला होता. नाशिकच्या परिवारावर लोणावळ्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा दोन वर्षांचा मुलगा स्विमिंग पुलजवळ एकटाच खेळत बसला होता. मात्र, यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो थेट स्विमिंग पुलमध्ये पडला. स्विमिंग पुलमध्ये पडल्यानंतर मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले.

बऱ्याच वेळापासून मुलगा दिसत नसल्याने आई-वडिलांनी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता आई- वडिलांना स्विमिंग पुलमध्ये मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. मुलाला तरंगताना पाहून आई वडिलांनी हंबरडा फोडला होता. ही संपूर्ण दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. शिवबा पवार असे या मयत झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. या घटनेनंतर नाशिक शहरात दुखाचे वातावरण बघायला मिळते आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याआधीच दुर्दैवी मृत्यु झाला आहे. ही अत्यंत दुखद घटना घडली आहे. आई-वडीलांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यु झाला असं या घटनेतून दिसत आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version