ठाण्यातील ठाणा कॉलेज परिसरातील खारटन रोड शितला माता मंदिर चौकातील रस्ता खचला आहे. या रस्त्यावर तब्बल १५ ते १६ फूट मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या ठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रस्ता खचला गेला आणि भलामोठा खड्डा पडला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण रस्ताच आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच ठिकाणाहून सिडको बस स्टॉप वरून नवी मुंबईच्या दिशेने बसेस सुटतात. तर, रेल्वे अंडरपास वरून चेंदणी कोळीवाडा, कोपरी या पूर्वेतील भागांतील वाहतूक सुरू असते. मात्र, सध्या ही पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली असून महापालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याठिकाणी तातडीने रोड दुरुस्तीचे काम सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.