अंकिता लोखंडेने जागतिक नृत्य दिनानिमित्त प्रेक्षकांना दिली एक व्हिज्युअल ट्रीट

अंकिता लोखंडेने जागतिक नृत्य दिनानिमित्त प्रेक्षकांना दिली एक व्हिज्युअल ट्रीट

जागतिक नृत्य दिनानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यामध्ये ती मनापासून नृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओसह अभिनेत्रीने तिच्यासाठी नृत्य काय आहे या बद्दल खास गोष्ट सांगितली आहे. तिने कॅप्शन लिहिल ” डान्स हा नेहमीच माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिला आहे. माझ्या पहिल्या शाळेच्या वार्षिक दिवसाचा परफॉर्मन्स पासून ते आतापर्यंत नृत्याने मला खूप काही शिकवले आहे. ही रील माझ्या नृत्याशी असलेल्या संबंधाचा फक्त एक छोटासा सारांश आहे ?आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या शुभेच्छा ??”

अंकिताने व्हिडिओ शेअर करताच तिचे चाहते आणि फॉलोअर्स तिच्या कमेंट मध्ये तिचं या बद्दल कौतुक केलं आहे. एका वापरकर्त्याने तिला “डान्सिंग क्वीन ❤️❤️❤️” म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “तू एक उत्तम डान्सर आहेस अंकु…आम्ही तुझ्यावर प्रेम करतो❤️”

दरम्यान वर्क फ्रंटवर अंकिता लोखंडे नुकतीच रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मध्ये यमुनाबाईची भूमिका साकारताना दिसली. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिचा पती विकी जैनसोबत ‘ला पिला दे शराब’ या नृत्य गाण्यासाठी एकत्र काम केले. आता ती संदीप सिंगची मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ या राजेशाही गणिकेच्या भूमिकेत उतरण्याच्या तयारीत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version