मुख्यमंत्री शिंदे यांना अभिनेता अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ

मुख्यमंत्री शिंदे यांना अभिनेता अनिल कपूरच्या ‘या’ भूमिकेची भुरळ

मुंबई, २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : मेगास्टार अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीत काही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत आणि त्यातील एक म्हणजे त्याचा ‘नायक’ चित्रपट ! या चित्रपटाची अनेकदा त्याच्या चाहत्यांनी चर्चा केली आहे आणि आता हा चित्रपट पुन्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉडकास्टवर मनीष पॉल यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट उघड केली. त्यात ते म्हणाले ” मला एस शंकर दिग्दर्शनातील अनिल कपूरची भूमिका मनापासून आवडली. नायक मधील अनिल कपूर यांचं काम उत्तम होत आणि हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे “

शिंदे यांना विचारण्यात आले की त्यांनी कधी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले आहे किंवा २००१ च्या रिलीजपासून प्रेरणा घेतली आहे ज्यावर त्यांनी उत्तर दिले ” फिल्म फिल्म है, वास्तविकता वास्तविकता है और कुछ भी नहीं (चित्रपट प्रेरणा देऊ शकतात, वास्तविकता वास्तविकता आहे आणि दुसरे काहीही नाही. ‘नायक’ मधील अनिल कपूरच्या व्यक्तिरेखेच कौतुक त्यांनी केलं. ‘नायक २’ भोवती चर्चा ना उधाण असताना अनिल कपूर दिग्दर्शक एस शंकरसोबत मुंबईत एकत्र सुद्धा दिसले.

https://www.instagram.com/reel/C6L74D4IT5w/?igsh=a3NkajdqYXVxejJ5

दरम्यान अनिल कपूर एकापाठोपाठ यश मिळवत आहे. ‘ ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ मधल्या त्यांचा भूमिकाच कौतुक झालं ज्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई तर केलीच सोबतीने केली नाही तर ओटीटी स्पेसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. अनिल कपूर YRF Spy Universe मध्ये सामील होणार असल्याची अफवा आहे. वृत्तानुसार, तो अजय देवगण स्टारर ‘दे दे प्यार दे २’ मध्ये देखील दिसणार आहे. सध्या त्यांचे चाहते सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version