खैबर पख्तुनख्वा, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामध्ये शांग्ला जिल्ह्यातील बेशम परिसरात एक आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर एका स्फोटकांनी भरलेल्या वाहनात होता. या वाहनाने चिनी अभियंत्यांना घेऊन जात असलेल्या वाहनाला धडक दिली. धडक बसताच स्फोट झाला. अपघातात पाच चिनी अभियंते आणि एक वाहनचालक अशा सहा जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. याआधी २०२१ मध्ये शांग्ला जिल्ह्यात झालेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात नऊ चिनी अभियंत्यांसह एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.