उज्जैनच्या महाकाल मंदिरात दुर्घटना

उज्जैनच्या महाकाल मंदिरात दुर्घटना

उज्जैन, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना आग लागली. आग लागल्यामुळे १४ जण भाजले. भाजलेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. आरतीवेळी कापूर प्रज्वलित करण्यात आला होता. धुळवडीनिमित्त मंदिरात कोणीतरी गुलाल उधळला. हा गुलाल कापराच्या संपर्कात आला आणि आग भडकली. थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण तोपर्यंत १४ जण भाजले होते. भाजलेल्या सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version