येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नवी दिल्ली, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरुन येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी द हिंदूला दिलेल्या माहितीनुसार, पॉक्सो कायद्याच्या कलम ८ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा,२०१२ च्या कलमाखाली कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version