सिद्धार्थ जाधव इंडिगो एअरलाईन्सवर का संतापला ?

सिद्धार्थ जाधव इंडिगो एअरलाईन्सवर का संतापला ?

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने अलीकडेच समाज माध्यमाद्वारे इंडिगो एअरलाईन्सबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, असे दिसून येते कि सिद्धार्थने मुंबई ते गोवा इंडिगो एअरलाईन्सने प्रवास केला असून त्या प्रवास दरम्यान झालेल्या घटनेबद्दल त्याने व्हिडिओद्वारे खुलासा केला.

बॅगेचे हाल पाहून सिद्धार्थची प्रतिक्रिया:
सिद्धार्थने त्याची तुटलेली बॅग दाखवली, जी त्याला त्याच्या मुंबई ते गोवा फ्लाइटनंतर मिळाली होती. व्हिडिओमध्ये सिद्धार्थने विनोदीपणे उद्गार काढले, “नमस्कार मी सिद्धार्थ जाधव आहे, नुकताच इंडिगो एअरलाइन्सच्या सौजन्याने माझी ही बॅग घेऊन गोव्यात उतरलो. सिद्धार्थच्या बॅगेचे हाल पाहून सिद्धार्थ म्हणाला काय छान काळजी घेतली आहे “हॅन्डल विथ केअर” केले आहे असे तो संतापून व्हिडिओद्वारे सांगतोय. त्यांना सामानाची काळजी कशी घ्यावी हे खरच माहित आहे, नाही का?” त्याचबरोबर सिद्धार्थने हैराण होऊन व्हिडिओला “धन्यवाद इंडिगो” असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, एका नेटिझनने टिप्पणी केली, “व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा, त्याची तक्रार करा!” प्रवासादरम्यान, विशेषतः आमच्या सामानासह अशा दुर्घटना घडतात तेव्हा हे दुर्दैवी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version