“राजा फोटो माझा काढ…. “; माधुरीचा मराठी गाण्यावर हटके अंदाज

“राजा फोटो माझा काढ…. “; माधुरीचा मराठी गाण्यावर हटके अंदाज

हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने नृत्याने आणि अनेक विशेष गुणांनी बोलीवूडमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली आहे. माधुरी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते . त्याचरोबर माधुरी तिच्या चाहत्यांसाठी आणि नेटकऱ्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजातले हटके लूक्स समाज माध्यमांवर शेअर करत असते. नुकताच माधुरीनं एका ट्रेंडिंग मराठी गाण्यावर डान्स करून व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आला असे चित्र दिसून येत आहे. कारण व्हिडिओवर लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

माधुरीचा जबरदस्त डान्स :


अभिनेत्री माधुरी दीक्षितने सध्या व्हायरल होणाऱ्या ” गुलाबी साडी लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा कधी….” या मराठी गाण्यावर हटके डान्स करून समाज माध्यमावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये माधुरी एका खास अंदाजात दिसून येते. मोकळे केस, डोळ्यावर गॉगल आणि लाल रंगाचा सुंदर ड्रेस अश्या हटके लुकमध्ये माधुरीने व्हिडिओ शेअर केला आहे. आणि त्याचबरोबर तिने पोस्ट खाली कॅप्शन दिलं आहे, “राजा फोटो माझा काढ”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version