हिमवर्षावात शिवाजी महाराज जयंती

हिमवर्षावात शिवाजी महाराज जयंती

कुपवाडा, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा येथे भारत – पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ हिमवर्षावात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. कुपवाडा येथे सैन्याच्या तळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. उणे तापमानात बर्फाच्छादित वातावरणात जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. या शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवाचा व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. याच ठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version