मुंबई , १८ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुणने नुकतेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एल खास पोस्ट शेअर करत आपण बाबा होणार असल्याची बातमीदिली आहे. त्याने पत्नी नताशा सोबतचा बेबी बंप फोटो पोस्ट करुन आपल्या घरी नवा पाहुणा येणार वृत्त दिले. वरुणने शेअर केलेली पोस्ट काही क्षणातच समाज माध्यमांवर व्हायरल झाली. यात वरुण हा त्याच्या पत्नीच्या बेबी बंपला किस करताना दिसतो आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.