मोदी आणि शाहंचे महाराष्ट्र दौरे रद्द

मोदी आणि शाहंचे महाराष्ट्र दौरे रद्द

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ फेब्रुवारी रोजी होणार असलेला महाराष्ट्र दौरा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा १५ फेब्रुवारी रोजी असलेला राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. राज्यसभा निवडणुकीआधी पंतप्रधान आणि गृहमंत्री महाराष्ट्राचा दौरा करणार होते. पण हे दोन्ही दौरे आता रद्द करण्यात आले आहेत. उत्तर भारतात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि महाराष्ट्रातले मराठा राजकारण या दोन कारणांमुळे हे दौरे रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. पण अधिकृतरित्या दौरे रद्द करण्याचे कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही.

पंतप्रधान मोदींचा १९ फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा रद्द
गृहमंत्री शाहंचा १५ फेब्रुवारीचा छ. संभाजीनगरचा दौरा रद्द

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version