नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि भारतातील हरितक्रांतीचे जनक वैज्ञानिक एम.एस. स्वामीनाथन यांना भारतररत्न जाहीर केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून सांगितले. याआधी देशाचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनाही भारतररत्न जाहीर करण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह : मरणोत्तर भारतरत्न
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव : मरणोत्तर भारतरत्न
माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी : भारतरत्न
माजी मुख्यमंत्री कर्पुरी सिंह ठाकूर : मरणोत्तर भारतरत्न
वैज्ञानिक डॉ. एम.एस. स्वामीनाथन : मरणोत्तर भारतरत्न
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.