केजरीवालांविरोधात ईडीची न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार

केजरीवालांविरोधात ईडीची न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य विक्रीच्या निमित्ताने आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात ईडीने पाच वेळा समन्स बजावले. पण केजरीवाल चौकशीला आले नाहीत. आता ईडीने राउस अॅव्हेन्यू येथील न्यायदंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी बुधवार ७ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. न्यायदंडाधिकारी या प्रकरणात काय निर्देश देतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version