झारखंडचे आमदार हैदराबादला

झारखंडचे आमदार हैदराबादला

रांची, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीने आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक केली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी नवा नेता म्हणून चंपई सोरेन यांची निवड केली आहे. अद्याप त्यांच्या शपथविधीचा दिवस ठरलेला नाही. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार रांची येथून विशेष विमानाने हैदराबादला रवाना होत असल्याचे वृत्त आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये एका सुरक्षितस्थळी आमदारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवले जाणार आहे.

हेमंत सोरेन यांना ईडी कोठडी

ईडीने हेमंत सोरेन यांना दहा दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली. पण विशेष पीएमएलए न्यायालयाने हेमंत सोरेन यांना एक दिवसाची ईडी कोठडी दिली आहे. ईडीचे पथक हेमंत सोरेन यांना शुक्रवारी पुन्हा विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करून ईडी कोठडी वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version