कररचनेत कोणताही बदल नाही

कररचनेत कोणताही बदल नाही

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभेत लेखानुदान सादर करताना कररचनेत कोणताही बदल केलेला नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले. यामुळे आर्थिक वर्ष २०२३ – २४ प्रमाणेच कररचना राहणार आहे.

वार्षिक उत्पन्न ० ते २.५ लाख रुपये – जुन्या रचनेत ० टक्के कर
वार्षिक उत्पन्न २.५ लाख ते ५ लाख रुपये – जुन्या रचनेत ५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न ५ लाख ते १० लाख रुपये- जुन्या रचनेत २० टक्के कर
वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक रुपये- जुन्या रचनेत ३० टक्के कर

वार्षिक उत्पन्न ० ते ३ लाख रुपये – नव्या रचनेत ० टक्के कर
वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपये – नव्या रचनेत ५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न ६ लाख ते ९ लाख रुपये – नव्या रचनेत १० टक्के कर
वार्षिक उत्पन्न ९ लाख ते १२ लाख रुपये – नव्या रचनेत १५ टक्के कर
वार्षिक उत्पन्न १२ लाख ते १५ लाख रुपये – नव्या रचनेत २० टक्के
वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा अधिक रुपये – नव्या रचनेत २० टक्के अधिक ३ टक्के (प्रत्येक अतिरिक्त लाख रुपयांमागे)

लेखानुदान लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात आले. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version