महाराष्ट्राचा चित्ररथ वादात

महाराष्ट्राचा चित्ररथ वादात

नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला. हा चित्ररथ सादरीकरणासाठी आला त्यावेळी चित्ररथावरून सादर केल्या जात असलेल्या बाबींची माहिती समालोचकाने दिली. ही माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा करण्यात आला. या उल्लेखावरून वाद सुरू झाला आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंत दाखवण्यात आली. चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा खेळताना दाखवल्या होत्या. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसत होत्या. त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले होते. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली होती. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवला होता. या दरबारात काही महिला आपल्या प्रश्नांसाठी उपस्थित असल्याचे दिसत होते. तर मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रा यांची प्रतिकृती होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version