प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महिलांना प्राधान्य

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महिलांना प्राधान्य

नवी दिल्ली, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत शुक्रवारी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातही महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या वैद्यकीय विभागातील महिला अधिकाऱ्यांचे पथक तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या महिला जवान आणि अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अशी दोन महिला जवानांची पथके संचलनात सहभागी होणार आहेत. तटरक्षक दलाच्या महिला जवानांचे पथक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व करणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांचे पथक तसेच सीमा सुरक्षा दलाच्या महिलांचे वाद्यवृंद पथक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version