हनुमानानं घेतलं रामाचं दर्शन

हनुमानानं घेतलं रामाचं दर्शन

अयोध्या २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रामजन्मभूमी मंदिरात एक अनोखी घटना घडली आहे. या घटनेची माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने ‘एक्स’ पोस्ट अर्थात ट्वीट करून दिली आहे.

संध्याकाळी ५.५० वाजता एक माकड मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून गूढ मंडपमार्गे थेट गर्भगृहात अर्थात गाभाऱ्यात पोहोचले. माकड उत्सव मूर्तीच्या जवळ पोहोचले. मंदिरातील सुरक्षा पथकाने गाभाऱ्यातले माकड बघितले. माकड उत्सव मूर्तीच्या जवळ होते. माकडाच्या हालचालींमुळे उत्सव मूर्तीला हानी होईल असे वाटल्यामुळे सुरक्षा पथकाचे जवान वेगाने गाभाऱ्यात शिरले. जवान आले तरी माकड शांत होते त्याने मूर्तीकडे बघितले. नंतर माकड शांतपणे मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजाच्या दिशेने गेले. तिथून बाहेर पडून भाविकांच्या गर्दीतून वाट काढत शांतपणे माकड निघून गेले, गर्दीतून जाताना माकडाने कोणालाही त्रास दिला नाही. हे बघून अनेकांना आश्चर्य वाटले. ज्यांनी ही घटना बघितली त्यांनी हनुमानानं रामाचं दर्शन घेतलं या शब्दात त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version