राजस्थानमध्ये ‘या’ दिवशी दारूबंदी

राजस्थानमध्ये ‘या’ दिवशी दारूबंदी

जयपूर, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत प्रभू रामाची २२ जानेवारी रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या निमित्त सोमवार २२ जानेवारी रोजी राजस्थानमध्ये दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. दारूबंदी असल्यामुळे सोमवार २२ जानेवारी रोजी राजस्थानमध्ये दारू विकली जाणार नाही, वाईन शॉप आणि देशी दारुची दुकानं बंद असतील. राजस्थानमध्ये २२ जानेवारी रोजी हॉटेल, बार या ठिकाणी दारू सर्व्ह केली जाणार नाही. राजस्थान व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्येही सोमवार २२ जानेवारी रोजी दारूबंदी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version