नवी दिल्ली, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : तांदुळाचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार १५ जानेवारी रोजी दिल्लीत एक बैठक घेणार आहे. या बैठकीला तांदुळाचे निर्माते, निर्यातदार, व्यापारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री पियुष गोयल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत तांदुळाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. केंद्र सरकार भारत ब्रँड अंतर्गत तांदुळाची विक्री करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याचीही शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.