श्रीहरीकोटा, १ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने एक एक्स-रे पोलरिमीटर उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या उपग्रहाचे तसेच इतर दहा उपग्रहांचे पीएसएलव्ही सी ५८ रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही सी ५८ या ४४ मीटर लांबीच्या २६० टन वजनाच्या रॉकेटद्वारे सोमवारी १ जानेवारी २०२४ रोजी ११ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला. आता कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठीही इस्रोने उपग्रह प्रक्षेपित केला आहे. एक्स-रे पोलरिमीटर उपग्रह कृष्णविवराचे आणि न्यूट्रॉन स्टार्सचे विश्लेषण करणार आहे. या विश्लेषमातून विश्व निर्मितीच्या रहस्याचा उलगडा होण्यास मदत होईल, असा विश्वास इस्रोने व्यक्त केला.
एक्सपोसॅट मोहिमेद्वारे इस्रोने एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहाचे तसेच इतर दहा उपग्रहांचे पीएसएलव्ही सी ५८ रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण केले. यातील एक्स-रे पोलरिमीटर उपग्रह ४६९ किलो वजनाचा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.