नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपा मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना तीन मंत्र दिले. तीन राज्यांतील विजयानंतर आलेला अतिआत्मविश्वास त्यागा आणि कामाला लागा. प्रत्यक्ष मतदानावेळच्या सूक्ष्म व्यवस्थापनासाठी दिल्लीहून येणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करा. लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर किमान दहा टक्के मते वाढवण्याच्या उद्देशाने काम करा. हे मंत्र पंतप्रधान मोदी यांनी दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.