गोपालदास इमारतीच्या ३ मजल्यांना आग

गोपालदास इमारतीच्या ३ मजल्यांना आग

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरातील गोपालदास भवन इमारतीच्या नवव्या, दहाव्या आणि अकराव्या मजल्याला आग लागली आहे. इमारतीच्या तीन मजल्यांना आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन दलाच्या सोळा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास गोपालदास भवनच्या अकराव्या मजल्यावर आग लागली. थोड्याच वेळात ही आग पसरली. अग्निशमन दलाने इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version