नवी दिल्ली, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : स्वदेशी लढाऊ मानवविरहीत विमान अर्थात ड्रोन विकसित करण्याच्या दिशेने भारताने आणखी एक पाऊल टाकले. डीआरडीओने शुक्रवारी १५ डिसेंबर २०२३ रोजी स्वदेशी स्टेल्थ ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली. ही स्वदेशी स्टेल्थ ड्रोनची दुसरी चाचणी आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमधून यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी लढाऊ ड्रोनच्या निर्मितीत अमेरिका, रशिया, चीन हे देश आघाडीवर आहेत. लवकरच त्यांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल. स्वदेशी लढाऊ ड्रोनच्या निमित्ताने भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.