प्रयागराज, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी संकुलातील शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेच्या सर्वेक्षणाबाबत अलाहाबादच्या अर्थात प्रयागराजच्या उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेवर सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण आयुक्त नेमण्यात येणार असून, ते संपूर्ण सर्वेक्षणावर लक्ष ठेवतील. प्रार्थनास्थळ कायद्यांतर्गत सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेवर सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.