नवी दिल्ली, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी बसपने खासदार दानिश अलींचे निलंबन केले. पक्षाने वारंवार सांगूनही दानिश अलींनी पक्षविरोधी कारवाया करणे थांबवले नाही. याच कारणामुळे पक्षाने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली.
दानिश अली हे वारंवार बस विरोधी आणि काँग्रेसचे समर्थन करणारी राजकीय भूमिका घेताना आढळले. यामुळे बहुजन समाज पक्षाने खासदार दानिश अलींना निलंबित केले.
दानिश अलींच्या तक्रारीचे काय होणार ?
पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी बरखास्त झाली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बहुजन समाज पक्षाने खासदार दानिश अलींना निलंबित केले. यामुळे दानिश अलींच्या तक्रारीचे काय होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संसदेत चर्चा सुरू असताना २१ सप्टेंबर २०२३ रोजी भाजपाचे खासदार रमेश बिधूडी यांनी दानिश अली यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. या प्रकरणी दानिश अली यांनी संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई होण्याआधीच दानिश अलींचे बसपमधून निलंबन झाले.
दानिश अली बसपमधून निलंबित
पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी कारवाई
उत्तर प्रदेशमधील अमरोहाचे खासदार आहेत दानिश अली
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.